processing...
urmodivadhuvar@gmail.com
7021228308 / 9870483020 / 8691984590
logo

उरमोडी वधू -वर सुचक केंद्र
स्वंयवर तुमचे कर्तव्य आमचे

श्री. समर्थाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरमोडी सातारा विभागातील मराठा समाजातील वधु वरांचे ऋुणानुबंध जुळवण्यासाठी आपल्या विभागातील उरमोडी धरणामुळे विस्थापित झालेल्या गावामुळे अपेक्षाप्रमाणे तसेच जुने ऋुणानुंबध दृढ करण्याकरीता स्वंयवर उरमोडी चॅरीटेबल ट्रस्ट संचलित उरमोडी वधु- वर सुचक केंद्र यांची स्थापना मुंबई येथे 26/01/2015 रोजी स्थापना करण्यात आली.

मराठा वधू वराना आपल्या अपेक्षेप्रमाणे स्थळे मिळावीत व नोंदणी सुलभतेने करता यावी या करीता संस्थेने उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या वतीने शाखा कार्यालयात वधु-वरांचे वैयक्तिक माहितीची सेवा व नोंदणी करून घेतली जाते. त्यामुळे वधु- वराचे विवाह कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात करणेसाठी तसेच मनपंसद अनुरूप व योग्य जोडीदार मिळवून देणेसाठी संस्था नेहमीच तत्पर असते.

उरमोडी वधु वर सुचक केंद्राच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने वधु- वराचे विवाह सुचक मेळावे दादर, ठाणे, सातारा, परळी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येतात. त्यामध्ये वधु-वराचे उच्चविभुषित समुउपदेशकाकडून समुउपदेशन करण्यात येते.

समाजातील प्रत्येक घटक हा समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि म्हणुनच राष्ट्राला निकोप सुसंस्कृत कुंटुब देण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. मला समाज काय देतो त्याहीपेक्षा मी समाजाला काय देतो हे अतिशय महत्वाचे आहे.

आज या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकादवारे अत्याधुनिक सेवा प्रदान करताना संस्थेस अत्यंत आनंद होत आहे. संस्थेच्या संगणक सेवेचा लाभ घेतल्याबद्दल उरमोडी वधु-वर सुचक केंद्र आपल्या सर्वांचे आभारी आहे. आम्ही संस्थेच्यावतीने आपले स्वागत करीतो आणि भावी जोडीदाराच्या आपल्या शोधास हार्दिक शुभेच्छा देतो.