नमस्कार ! उरमोडी वधु वर सुचक केंद्राच्या वेब साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे. मराठा समाज संपुर्ण जगभर पसरलेला आहे त्यामुळे लग्न जमवणे हल्ली कठीण समस्या होऊन बसली आहे. ५ वर्षे पुर्ण केलेल्या या संस्थे मार्फ़त आत्ता पर्य़ंत २००० पेक्षा जास्त विवाह जमवले गेले आहेत. २०१८ मध्ये परिपूर्ण जोडीदार शोधासाठी ही वेबसाइट आम्ही विकसित केली आहे. आमच्या कडे वधू आणि वर यांची भरपूर ऑनलाईन स्थळं आहेत. त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर्स, सीए, सीएस, व्यवसाय वर्ग आणि इतर प्रोफाइल असा अनेक प्रकारचा सर्वात मोठा डेटाबेस आहे. आपण ऑनलाईन फ़ॉर्म भरून किंवा आमच्या पत्त्यावर कार्यालयात येऊन आपले नाव नोंदवू शकता आणि घरबसल्या मनपसंद जावई किंवा सून शोधू शकता. समाजातील प्रत्येक घटक हा समाजाचे काहीतरी देणं लागतो आणि म्हणुनच राष्ट्राला एक निकोप सुसंस्कृत कुटुंब देण्याचा आमचा मुख्य हेतु आहे. मला समाज काय देतो त्याही पेक्षा मी समाजाला काय देतो हे अतिशय महत्वाचे आहे. धन्यवाद !
श्री. समर्थाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरमोडी सातारा विभागातील मराठा समाजातील वधु वरांचे ऋुणानुबंध जुळवण्यासाठी आपल्या विभागातील उरमोडी धरणामुळे विस्थापित झालेल्या गावामुळे अपेक्षाप्रमाणे तसेच जुने ऋुणानुंबध दृढ करण्याकरीता स्वंयवर उरमोडी चॅरीटेबल ट्रस्ट संचलित उरमोडी वधु- वर सुचक केंद्र यांची स्थापना मुंबई येथे २६ जानेवारी २०१५ रोजी स्थापना करण्यात आली.
उरमोडी वधु वर सुचक केंद्राच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने वधु- वराचे विवाह सुचक मेळावे दादर, ठाणे, सातारा, परळी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येतात. त्यामध्ये वधु-वराचे उच्चविभुषित समुउपदेशकाकडून समुउपदेशन करण्यात येते.